Breaking News

पिल्ले कॉलेजात प्लॅस्टिक पुनर्वापर यंत्र

पनवेल : बातमीदार

नवीन पनवेल येथील पिल्ले कॉलेजात प्लॅस्टिक बॉटल रिसायकलिंग मशीन अर्थात प्लॅस्टिक पुनर्वापर यंत्र बसविण्यात आले आहे. प्लॅस्टिक बाटल्यांचा कचरा परिसरात होऊ नये म्हणून लावण्यात आलेल्या मशीनमुळे अशा प्रकारचे मशीन असणारे हे महाराष्ट्रातील पहिले कॉलेज ठरले आहे. सोमवारी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या मशीनचे उद्घाटन करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून नवी मुंबई परिसरातील नामांकित कॉलेज म्हणून ओळखले जाणार्‍या डॉ. के. एम. वासुदेवन पिल्ले कॉलेजात प्लॅस्टिक बाटल्यांचे रिसायकलिंग करण्यात येणारे मशीन लावण्याचा निर्णय घेतला. कॉलेजचा परिसर प्लॅस्टिक बाटलीमुक्त व्हावा, या हेतूने ही मशीन घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विशेष म्हणजे या प्लॅस्टिकचा वापर पुन्हा करण्यात येणार असून यापासून पिशवी तयार करण्यात येणार असल्याची माहिती कॉलेजच्या निवेदिता श्रेयन्स यांनी दिली. आयुक्त गणेश देशमुख यांनी उद्घाटन करताना कॉलेजचे कौतुक करीत प्लॅस्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात येणारी ही मशीन कॉलेजमध्ये लावण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पनवेल महापालिका क्षेत्रातील मोठ्या रहिवासी सोसायट्यांनी अशा प्रकारचे मशीन लावण्याचे आवाहन केले. पिल्ले कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये लावण्यात आलेल्या या मशीनच्या उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. एम. वासुदेवन पिल्लई, कार्यकारी अधिकारी प्रिअम पिल्ले, प्राचार्य डॉ. संदीप जोशी यांच्यासह बायोक्रेक्स इंडियाचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply