Breaking News

भाजप नेते चंद्रकांत घरत यांच्याकडून उरणमध्ये गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

उरण : वार्ताहर

कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी शासनाने 21  दिवसांचे लॉकडाऊन केले आहे. हातावर पोट असलेल्या गरिबांचे खूप हाल झाले आहेत. त्यांना हाताला काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत यांच्या वतीने गरिबांना सोमवारी (दि. 6) जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. हनुमान कोळीवाडा येथील 90 गरीब, गरजू लोकांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ, पाच किलो गव्हाचे पीठ, साखर, गोडेतेल, कांदे, बटाटे, हळद, लसूण, मीठ, मसाला पावडर असे किराणा सामान दिले. न्हावाशेवा पोलीस स्टेशनच्या बाजूस असलेल्या झोपडपट्टीत 500 किलो तांदूळ, 300 किलो गव्हाचे पीठ, कांदे, बटाटे व इतर किराणा सामान देण्यात आले. जेएनपीटी पेट्रोल पंपाजवळ असलेल्या झोपड्यांमध्ये 200 किलो तांदूळ व 150 किलो गव्हाचे पीठ व इतर किरणा सामान देण्यात आले. डॉ. तनेजा यांचे केअर पॉईंट हॉस्पिटल (बोकडविरा) येथे क्वॉरंटाइनमध्ये ठेवण्यात आलेल्या व्यक्तींना लागणारा रोज पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती देण्यात आली आहे.या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, भाजप उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील, हनुमान कोळीवाडा माजी सरपंच गौरव कोळी, भाजप रायगड जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत घरत व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. हातावर पोट असलेल्या गरिबांचे लॉकडाऊनमुळे जगणे मुश्कील झाले आहे. त्यांची उपासमार होत आहे. सामाजिक बांधिलकी या उद्देशाने आपण सर्वांनी मदतीचा हात देणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या कमी इतर सामाजिक संस्थेने पुढे येऊन  गरिबांना मदत करावी. आम्ही सर्वतोपरीने मदत करणार आहोत, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply