Breaking News

भागधारकांना सहाय्य करून जेएनपीटीत अत्यावश्यक सेवा

उरण : वार्ताहर

भारत सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशामध्ये पुरवठा साखळी (सप्लाय चेन) चालू ठेवण्यासाठी बंदर क्षेत्र हे अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले गेले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे एक प्रमुख बंदर असून आवश्यक सेवांच्या कक्षेत येते त्यामुळे जेएनपीटीच्या सर्व टर्मिनल्सचे कार्य सुरूच राहील. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय सेठी म्हणाले की, जेएनपीटी ने केंद्र व राज्य शासनाने जारी केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या करुन सीएफएस आणि बंदरातून, पर्यंत कंटेनरची मुक्त वाहतुक सुनिश्चित केली आहे, त्यामुळे शिपिंग लाईन्स, कंटेनर फ्रेट स्टेशन (सीएफएस), कस्टम हाऊस एजंट्स (सीएचए), वाहतूकदार, कॉनकोर, खाजगी कंटेनर ट्रेन ऑपरेटर, ट्रक वाहतूकदार, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टी व संबंधित टँक फार्म, रिकामे यार्ड ऑपरेटर, फसाईसारख्या भागीदार सरकारी एजन्सीज, पोर्ट ऑपरेशन्सशी संबंधित क्वारंटाइन प्लांट सारख्या अन्य एजन्सीचे कार्य सुरूच राहील व या कठीन परिस्थितीत पोर्टला आपले कर्तव्य पूर्ण करता यावे यासाठी त्यांचे कार्य निर्धारित कार्यक्रमाप्रमाणे सुरू राहील. जेएनपीटीने टर्मिनल कामगार, वाहन चालक यांच्यासाठी जेएनपीटी टाउनशिपमध्ये निवास व्यवस्था केली आहे, आवश्यक सेवा भागधारकांच्या कर्मचार्‍यांना पोर्ट क्षेत्र, सीएफएस व रिकामे यार्ड येथे प्रवास करण्यासाठी विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून दिली आहे, तसेच वाहन चालकांना पार्किंग प्लाझामध्ये जेवणाची पाकिटे व पाण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  जेएनपीटीमध्ये पर्याप्त साठवणूक क्षमता आहे आणि मालाची विनाअडथळा वाहतुक चालू ठेवण्यासाठी विनामूल्य कालावधीनंतर ही कंटेनर पोर्टमध्ये ठेवले जावू शकतात. या गोष्टींमुळे बंदरात वाहनांची गर्दी होत नाही व विना अडथळा व्यापार सुरू ठेवण्यास मदत झाली आहे. जेएनपीटीने आपल्या ग्राहकांना भेडसावत असलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक नियंत्रण कक्ष देखील सुरू केला आहे. या नियंत्रण कक्षाशी 022-2724077, 67814022 नंबर वर सकाळी 8 ते संध्याकाळी 8 दरम्यान किंवा controlroomjnport.gov.in या ईमेलवर संपर्क केला जावू शकतो. वरील सर्व प्रयत्नांमुळे सर्व पाच कंटेनर टर्मिनल्स व एका लिक्विड टर्मिनलचे कार्य सुरळीतपणे चालू आहे आणि 31 मार्च पर्यंत सीएफएस पासून-पर्यंत कंटेनरची 8000 टीईयूपेक्षा जास्त वाहतूक झाली आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply