Breaking News

मुख्यमंत्र्यांनी ‘तो’ उल्लेख घेतला मागे

साईबाबांच्या जन्मस्थळ वादावर पडदा

मुंबई : प्रतिनिधी
साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर अखेर सामोपचाराने पडदा पडला आहे. साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नाही, तर तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास होणार असल्यास आमची कोणतीही हरकत नाही, अशी भूमिका शिर्डीतील ग्रामस्थ प्रतिनिधींनी बैठकीत मांडली. ही भूमिका दोन्ही बाजूने मान्य झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाथरीचा साईबाबांचे जन्मस्थळ हा उल्लेख या वेळी मागे घेतला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी पाथरीचा उल्लेख साईबाबांचे जन्मस्थळ असा करून पाथरीसाठी विकास योजना जाहीर केल्याने वादाला तोंड फुटले होते. पाथरी नव्हे, तर शिर्डी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असल्याचे निक्षून सांगत शिर्डीकरांनी बेमुदत शिर्डी बंद पुकारला होता. या प्रश्नावर सोमवारी (दि. 20) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयामध्ये तातडीची बैठक झाली. या वेळी ’पाथरी तीर्थक्षेत्र विकास’ हे नाव योजनेसाठी निश्चित झाले आणि वाद संपुष्टात आला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply