Breaking News

केंद्राच्या मोफत धान्याचे महाडमध्ये वाटप सुरू

महाड : प्रतिनिधी – कोरोना विषाणूचा प्रसार आणि फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी लागू आहे. या बंदीदरम्यान गरीबांना मोफत धान्य देण्याची केंद्राची योजना असून राज्य सरकारने ही योजना राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. महाड तालुक्यातील रेशन दुकानावर त्याचे वाटप सुरू झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या विषाणूविरोधात लढण्यासाठी देशवासीयांना मानसिक बळ दिले आहे. त्याचबरोबर गोरगरीबांना मोफत धान्य देऊन शारीरिक बळही दिले आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय बंद झाले आहेत. लोकांना रोजगार नसल्याने गरीब जनतेचे अन्नाविना हाल होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने अन्न सुरक्षा आणि अंत्योदय योजनेतील नागरिकांना माणसी पोराच किलो तांदुळ मोफत देण्याची योजना राबविली आहे. यापुढे राज्य सरकारच्या तीन किलो गहू आणि दोन किलो तांदळासोबत केंद्राचे पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहेत.

सरकारच्या योजनेतंर्गत महाड तालुक्यात लाडवली या गावापासून धान्य वाटप सुरू करण्यात आले. लाडवलीचे सरपंच कृष्णा शिंदे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अकबर ढोकले, पोलीस पाटील ईलियास ढोकले, ग्रामसेवक मांडवर, पत्रकार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत गरीब, गरजू लाभार्थींना धान्य देण्यात आले.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply