महालण विभाग अध्यक्ष महेश कडू यांच्याकडून 230 आदिवासी कुटुंबांना धान्याचे वाटप
उरण : रामप्रहर वृत्त – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे आदिवासी कुटुंबियांना हाल सहन करावे लागत असल्याचे निदर्शनास येताच, भाजपचे महालण विभाग अध्यक्ष तथा सोनारी गावचे माजी सरपंच महेश कडू यांनी आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच उरण व पनवेल तालुक्यातील 230 आदिवासी कुटुंबियांना तांदूळ आणि अन्य कडधान्याचे वाटप केले.
कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण आणण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे आदिवासी बांधवांना रोजगार मिळत नसल्याने व स्वता जवळील पैसे, घरातील अन्नधान्य संपल्याने आदिवासी बांधवांना जेवणातील अन्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. यांचे गांभीर्य ओळखून महेश कडू यांनी सोनारी ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष तथा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिनेश तांडेल, विंधणे गावचे प्रसाद उर्फ गंपुशेठ पाटील आणि आपले सहकारी मित्र परिवार यांच्या उपस्थितीत उरण तालुक्यातील विंधणे आदिवासी वाडी, चिरनेर गावातील आदिवासी वाडी आणि पनवेल तालुक्यातील आदिवासी वाडी वरील 230 आदिवासी कुटुंबियांना तांदूळा बरोबर कडधान्याचे वाटप केले.
खांदा कॉलनी : माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर व महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेक्टर 12 येथील परिसरातील गरजू,आदिवासी, झोपडपट्टीमधील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती संजय भोपी, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, प्रभाग 15 चे अध्यक्ष शांताराम महाडिक उपस्थित होते.
वलप (ता. पनवेल) : पनवेल भाजपकडून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासीवाडीत धान्यवाटप करण्यात आले. या वेळी वावंजे जिल्हा परिषद चिटणीस अंकुश पाटील, वारकरी सांप्रदाय तालुका अध्यक्ष हभप हरिदास टेंभे, वलप ग्रामपंचायत सदस्य नवनाथ खुरारकर, भरत पाटील, हरिश्चंद्र खारेकर, केशव टेंभे, नरेश पाटील, महेंद्र पाटील, अशिष पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.