Breaking News

नागरिकांनी घरात राहावे -पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे

मोहोपाडा : प्रतिनिधी – रसायनी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी लॉकडाऊन काळात नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे.

सध्या सर्वत्र लॉकडाऊन असल्याने रसायनी परिसरात कोरोनाची घुसखोरी होवू नये म्हणून रसायनी पोलीस ठाण्याच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मण रेषेवरील आपटा चेक बुथ, सावले चेक बुथ, दांडफाटा चेक बुथ, मोहोपाडा चेक बुथवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पोलीस यंत्रणेकडून परिसरात ये-जा करणार्‍यांची कसून चौकशी सुरू आहे. तसेच विनाकारण वाहन फिरविणार्‍यांवरही कारवाई होताना दिसत आहे.

रसायनी पाताळगंगा हा औद्योगिक करणाने नटलेला परिसर असून परिसरात मोहोपाडा, रिस व वावेघर बाजारपेठ आहेत. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत या परिसरातील बहुतांशी परीसर येत असून अनेक गावं, वाड्या, वसाहती येतात. रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीचे क्षेत्रही मोठे आहे. परंतु रसायनी पोलीस ठाण्याला 52 पोलीस कर्मचारी व तीन स्टाफ असे

पोलीस कुटुंब आहे.

दरम्यान अपुरे पोलीस कर्मचारी संख्येचा प्रश्न सर्वंच पोलीस ठाण्यात भेडसावत असूनही नेहमी गुन्हेगारांशी दोन हात करणारे हात सध्या कोरोना लढाईत गुंतले असून रसायनीकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न रसायनी पोलीस करीत आहेत. पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविणकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक आश्विनी मोहिते यांच्यासह सर्वच पोलीस कर्मचारी रात्रीचा दिवस करून कोरोनाला रोखून रसायनीकरांची सुरक्षा वाढविण्यासाठी तटस्थ आहेत. रसायनी व आसपासच्या परिसरात कुठेही गर्दी होवू नये यासाठी योग्य नियोजनाचे धडे पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांनी

नागरिकांना दिले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply