Breaking News

अनाथ बालिकांना मदतीचा हात

रेवदंडा पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

रेवदंडा ः प्रतिनिधी – कोरोनाच्या संकटकाळात रेवदंडा पोलिसांनी अनाथांचे नाथ बनून कोर्लई आश्रमातील अनाथ बालिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांना गरजेचे आठ दिवसांचे अन्नधान्य व खाद्यवस्तूंचे वाटप करण्यात आले. रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीतील मुरूड तालुक्यात कोर्लई येथे शांतीवन बालिका आश्रम आहे. या आश्रमात 30 मुली शिक्षण घेत आहेत. 

रेवदंडा पोलिसांनी कोर्लईच्या सेंट मेरी बालिका आश्रमातील अनाथ मुलींसाठी मदतीचा हात पुढे केला. आश्रमात आठ दिवसांसाठी लागणारे अन्नधान्य, खाद्यपदार्थ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व जीवनावश्यक वस्तू आश्रमातील अनाथ बालिकांकडे सुपूर्द केल्या. रेवदंडा पोलीस ठाणे इन्चार्ज पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी पोलिसांतील माणुसकीचे दर्शन घडवत गरीब व अनाथांसाठी प्रेम दाखविल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply