नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.5) राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. या वेळी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती कोविंद यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मुद्द्यांची माहिती देत चर्चा केली.
पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली, मात्र या दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत नेमकी माहिती अद्याप मिळालेली नाही. राष्ट्रपती भवनाकडून एक ट्विट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा झाली, असे यामध्ये सांगण्यात आले आहे. चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी लडाखचा दौरा केल्यानंतर घेतलेली राष्ट्रपतींची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …