Breaking News

लॉकडाऊनच्या काळात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातच थांबा -आयुक्त

नवी मुंबई : बातमीदार

कोरोना विषाणूचा प्रसार संसर्गातून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक गोष्टींबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता विशेष काळजी नवी मुंबई महापालिकेकडून घेण्यात येत आहे. मात्र सध्या नवी मुंबईतील कोरोना बाधितांच्या तपशीलाचा घेतल्यास नवी मुंबई बाहेरील क्षेत्रातून, विशेषत्वाने मुंबई शहरातून ये-जा करणार्‍या व्यक्तींमुळे कोरोनाचा प्रसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे  बाहेरच्या शहरांत ये-जा करू नका नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातच थांबण्याचे आवाहन पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नागरिकांना केले आहे. यामध्ये, मुंबईतील विविध रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, अ‍ॅम्बुलन्स ड्रायव्हर या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांचेसह बँकींग व इतर अत्यावश्यक कामकाजासाठी ये-जा करणार्‍या व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे व नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात त्यांचा निवास असल्याने त्यांच्यामुळे त्यांचे कुटूंबिय व त्यांचे निकटवर्तीय कोरोना बाधित झाल्याचे निदर्शनास येत आहे. मुंबईतून नवी मुंबईत लागण झालेल्या कोरोना बाधितांचे प्रमाण एकूण बाधितांच्या 63 टक्के इतके लक्षणीय आहे. या बाबींचा विचार करता, नवी मुंबईतून मुंबई व इतर शहरात अत्यावश्यक सेवा देणार्‍या व त्यासाठी दररोज प्रवास करणार्‍या नवी मुंबईकर नागरिकांना याव्दारे सुचित करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या व निकटवर्तीयांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून बाहेर मुंबई ब इतर ठिकाणी शक्यतो जाण्याचे टाळावे आणि जाणे अत्यंत आवश्यक असल्यास त्याच शहरात आपल्या निवार्‍याची लॉकडाऊनपर्यंत व्यवस्था करण्यास, ज्या आस्थापनेत सेवा बजावतात त्या आस्थापनांना सुचित करावे. नवी मुंबई शहराचे सामाजिक आरोग्य जपण्यासाठी कर्तव्य भावनेने सहकार्य करण्याचे आयुक्तांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply