Breaking News

उरणमधील तीन रुग्ण कोरोनामुक्त, तर चौथाही मुक्तीच्या मार्गावर

उरण : प्रतिनिधी

जगभरात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसने मागील दीड महिन्यांमध्ये सर्वांना सळो की पळो करून सोडले असून, या संसर्गाने सर्वच ठिकाणची शासकीय यंत्रणा रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून सतर्क झाली आहे. उरण तालुक्यात 12 एप्रिल 2020 रोजी पाहिले दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले होते. यामध्ये उरण कोटनाका येथील परिसरात एक व जेएनपीटी कामगार वसाहत येथील सेक्टर-2 मध्ये एक महिला असे दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. याशिवाय 17 एप्रिलला जासई येथील रेल्वे कॉलिनी येथील रेल्वे कर्मचारी, त्यानंतर 20 एप्रिलला जासई येथील भाडोत्री राहत असलेल्या कुटुंबातील दिड वर्षाचे बालकाला कोरोनाने ग्रासले होते. मात्र अहोरात्र मेहेनत घेत असलेले डॉक्टर, नर्स आणि आस्थापनांचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अथक प्रयनत्नांमुळे या उरण तालुक्यातील कोरोना बाधित झालेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण या आजारातून मुक्त झाले असून, त्यांना पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातून त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. 20 एप्रिलला बाधित झालेल्या दीड वर्षाच्या बालकाने कोरोनाला हरवले असून, या पैकी उरण तालुक्यातील सर्व प्रथम कोरोना बाधित रुग्ण म्हणून नोंद झालेला उरण कोटनाका येथील परेश भोईर, दुसरी जेएनपीटी कामगार वसाहत येथील सीआयसएफ जवानाची पत्नी वर्षा यादव हे तीन रुग्णांची या कोरोनाच्या संकटापासून सुटका झाली आहे. या तीनही कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांचे त्यांच्या निवासस्थानी उपस्थित नागरिकांनी टाळ्यांनी स्वागत करून पुष्पवृष्ठी केली. तर 17 एप्रिलला कोरोना बाधित झालेला 28 वर्षीय तरुणाची तब्बेत आत्ता ठणठणीत असून, त्याची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्याच्या आणखी चाचण्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी असून, या जासई येथील रेल्वे कॉलनीतील तरुण कामगाराला एक-दोन दिवसात त्याच्या घरी सोडण्यात येणार आहे. यापैकी उरण शहरातील रुग्ण कोरोना मुक्त झाला म्हणून त्याला सोमवारी रात्री उशिरा पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातून सोडण्यात आले होते. मात्र आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी या रुग्णाला रात्री अडीच वाजताचे सुमारास पुन्हा पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्याच्या तिन्ही तपासण्या निगेटिव्ह आल्याने त्याला काल घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आत्ता उरणमध्ये फक्त एक कोरोना रुग्णाची नोंद राहिली असून, तिही एकदोन दिवसात संपुष्टात येणार असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply