Breaking News

कर्जत येथे रक्तदान शिबिर

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यात सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.डिकसळ येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून 144 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून राज्य शासनाच्या आवाहनानुसार रक्तदान शिबिर आयोजित केले होते. 6 एप्रिलला नेरळ येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते आणि त्यात 155 रक्तदात्यांनी रक्तदान करून यशस्वी केले होते. रविवारी (दि. 3 मे) कर्जत अपडेट ग्रुपच्या माध्यमातून डिकसळ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. डिकसळ येथे रक्तदान शिबिर ग्रामस्थ मंडळ डिकसळ आणि उमरोली तसेच श्रीपती बाबा मित्र मंडळ, पोलीस मित्र संघटना, कर्जत मेडिकल असोसिएशन आणि सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांच्या सहकार्याने साईकृपा हॉटेल येथे आयोजित केले होते. कर्जत अपडेट ग्रुपचे कर्जत अपडेट ग्रुपचे सागर शेळके, किशोर गायकवाड, अविनाश भासे, शिवाजी कराळे, ज्ञानेश्वर साळोखे, सुप्रेश साळोखे, उत्तम गायकवाड, सचिन गायकवाड, हेमंत कोंडीलकर, पंकज बुंधाटे, शिवसेवक गुप्ता, आतिष हातनोलकर, तसेच जीवक गायकवाड, गणेश पवार, दीपक पाटील, अजय गायकवाड, प्रथमेश कर्णिक, संतोष भासे, गणेश पुरवंत, प्रेरणा गायकवाड, अक्षता गायकवाड यांच्यामुळे यशस्वी झाले. शिबिरात रक्त संक्रमण करण्याचे काम मुंबई येथील मुंबई रेड क्रॉस सोसायटीच्या पथकाने केले. त्यात डॉ वजरेकर, आरोग्यसेवक सुशीलकुमार हिवाळे, तसेच लता झाडे, रंजित कदम, वैशाली जांभळे, दीपक महापती, जयराम पंडित, संजय जामदार, त्रिवेणी पटन्स, विद्या महाबळे, कृष्णा डावरे यांनी रक्त संक्रमण करून घेतले.

पनवेल येथे रक्तदान शिबिर उत्साहात

पनवेल : वार्ताहर

सध्याच्या स्थितीला रुग्णालयात उपचार घेणार्‍या बांधवांना रक्ताची नितांत गरज असल्याने सिटीझन्स युनिटी फोरम कच्छ युवक संघ व बिरमोळे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 3) मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन बिरमोळे हॉस्पिटल ठाणा नाका येथे घेण्यात आले होत. त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरासाठी आवश्यक असणार्‍या सर्व शासकीय संमती आयोजकांतर्फे घेण्यात आल्या होत्या. यावेळी मोठ्या संख्येने तरूण वर्ग रक्तदानासाठी उपस्थित होता. सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून सर्वांनी रक्तदान केल्याची माहिती डॉ. भगवान बिरमोळे यांनी दिली.

पेण येथे रक्तदान शिबिराला प्रतिसाद

पेण ः लक्ष्मी नारायण मित्र मंडळ व कामोठे एमजीएम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रामवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला 200 लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले. या कार्यक्रमासाठी दीपक रामाणे, गजानन पाटील, अजित सुतार, विवेक म्हात्रे, राकेश पाटील, अजित म्हात्रे व मित्रपरिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply