नवी दिल्ली : कोरोना व्हायरसचा सामना करताना भारतासाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्यासाठी आता अधिक काळ लागत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनामुळे मरणार्यांचा दर जगाच्या तुलनेत सर्वांत कमी आहे. गेले 14 दिवस देशातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 10.5 एवढा होता. तो आता जवळपास 12 दिवसांवर पोहचला आहे, तसेच आपला मृत्युदर 3.2 टक्के एवढा आहे. हा मृत्युदर जगात सर्वांत कमी आहे. विशेष म्हणजे देशातील 10,632 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातही गेला आहे. कोरोना मृतांची संख्या 1,301 झाली आहे, तर कोरोनाबाधित एकूण रुग्णांची संख्या आता 39,980वर पोहचली आहे. सद्यस्थितीत 28,046 लोक कोरोनाबाधित आहेत.
Check Also
तळोजा मजकूरमध्ये शिवरायांच्या मंदिराचा वर्धापन दिन
तळोजा : रामप्रहर वृत्ततळोजा मजकूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा पहिला वर्धापन दिन रविवारी …