Breaking News

पेणचे वैभव धनावडे साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित

पेण : रामप्रहर वृत्त

नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पेणचे वैभव दिलीप धनावडे यांना साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धनावडे यांच्या ‘माझा एकलेपणा’ या चारोळी संग्रहाला पुण्यातील साहित्य गौरव या संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात आला. तो संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मराठी साहित्यविश्वात दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठी साहित्यासाठी योगदान देणार्‍या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. अभियंते म्हणून कार्यरत असलेले वैभव धनावडे चारोळी, कविता, कथा असे विविध साहित्यप्रकार लीलया हाताळतात. या पुरस्काराबद्दल धनावडे यांनी डॉ. मधुसूदन घाणेकर, डॉ. योगेश जोशी, ऋचा थत्ते आणि अक्षर आनंद न्यूज पोर्टल यांचे आभार मानले. पुरस्काराबद्दल श्री. धनावडे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply