कळंबोली : प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या संकटात देशसह राज्यात लॉकडाऊन केल्याने आदिवासी, झोपडपट्टावासी, निराधार महिला व गोरगरीबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा पाटील सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून भाजपचे नेते कूष्णा पाटील यांनी 150 गरजू कुटुंबाना महिनाभराचे अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हातावर पोट असणा-याना आदिवासी बांधव, झोपडपट्टीवासी, गोरगरीब कामगार व निराधार महिलाना बसला आहे. काम बंद असल्याने जवळ असलेला पैसा व घरातील अन्नधान्य संपल्याने तो मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याला एक वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो. कानपोली, वलप, येथील आदिवासी बांधवांवर , तळोजा ओद्योगिक वसाहतील झोपडपटीवासी व निराधार महिलांवर उपासमारीची वेळ आली आहे. या संकटकालीन परिस्थितीत कोणीही उपासी राहू नये यासाठी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी भोजन किचन सेंटर सुरू केले आहेत. याच विचारावर आधारित भाजप नेते कृष्णा पाटील यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने गावातील 200 कुटुंबाना महिनाभराच्या भोजनाची व्यवस्था होईल असा जीवनावश्यक वस्तूचे वाटप सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर नियमांचे पालन करून केले आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांचे आदिवासी बांधव, झोपडपट्टीवासी व निराघार महिलांकडून कौतूक होत आहे.