Breaking News

अवकाळी पावसामुळे पिकांची नासाडी

उरण : वार्ताहर

नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील भातपीक पाण्याखाली आले आहे. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी शेतात असलेल्या पावसामुळे तयार झालेले पीक व  कापणी केलेल्या पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे बळीराजा पुरता उद्ध्वस्त झाला आहे. उरण तालुक्यातील शेतकर्‍यांचे भात हे एकमेव नगदी पीक आहे. आजही शेकडो एकर शेतीत शेतकरी पीक घेतले जाते. मजुरांचे दर वाढल्याने भातशेती सध्या फायद्याची राहिली नाही, तरी आपल्या कुटुंबाच्या उपजीविकेसाठी शेतकरी पीक घेत आहेत. येथे उच्च प्रतीचा तांदूळ मिळत असल्याने अनेक शेतकरी खर्च करून भाताच्या विविध वाणांची लागवड आवडीने करतात. या वर्षी चांगला पाऊस पडल्यामुळे भातपीक जोरदार आले होते, मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे जोरदार पीक शेतात साचलेल्या पाण्याखाली बुडाले आहे. कापणीला सुरुवात झाली होती, पण अवकाळी पावसामुळे भात शेतीची नासाडी झाली. साचलेले पाणी कितीही प्रयत्न करूनही कमी होत नसल्याने पाण्यात बुडालेले पिक कुजून त्याची चिखल माती झाल्याचे चित्र  भात शेतीत दिसत आहे. या अस्मानी संकटाने शेतकरी वर्ग पूर्ण उद्ध्वस्त झाला असून तो शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या भातशेतीचे लवकरच संरक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय निर्णयामुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. भातशेतीत सध्या तोट्यातील व्यवसाय झाला आहे. त्यातच अशा अस्मानी संकटाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत आहे. परिणामी भाषेतील पर्यायी व्यवसाय शोधण्यासाठी आता वेळ आली आहे, असे चिरनेर येथील प्रयोगशील शेतकरी कृष्णा अनंत म्हात्रे यांनी सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply