पनवेल ः रोटरीचे सेवाभावी काम नेहमीप्रमाणे सुरू असून मदतीच्या काळात त्यांनी समाजातील सर्व स्तरांना खुल्या मनाने मदत केली आहे. त्या अनुषंगाने पनवेल परिसरातील पोलीस बांधवांना तसेच तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचार्यांसाठी 400 फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ पनवेल एलिटने पनवेल पोलिसांना 200 आणि पनवेल तहसील कार्यालयात 200 फेस शिल्डचे वितरण केले. कार्यक्रमाचे संयोजन अॅड. प्रसाद कोंडेदेशमुख यांनी केले. अध्यक्ष रितेश मुनोत, कोषाध्यक्ष मनोज मुनोत, भाविन जैन अॅनेट ध्रुव जैन फेस शिल्ड या वेळी उपस्थित होते.
Check Also
शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव
पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …