Breaking News

सुकेळी खिंडीजवळ मिनीडोर-कार अपघात

नागोठणे : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावर सुकेळी खिंडीनजीक रविवारी (दि. 24) दुपारी 12च्या सुमारास मिनीडोर प्रवासी रिक्षा आणि कार यांच्यात समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात नागोठण्यातील रिक्षाचालक गणेश जाधव यांचा मृत्यू झाला, तर दोन्ही वाहनांतील प्रवासी जखमी झाले आहेत.

गणेश जाधव हे मिनीडोर रिक्षा (एमएच 06-जे 1972) घेऊन नागोठणे रेल्वेस्थानकात उतरलेल्या प्रवाशांना घेऊन कोलाडकडे, तर एमएच 02-इयू 7212 क्रमांकाची कार मुंबईकडे जात असताना खांब बाजूकडील सुकेळी खिंडीजवळ हा अपघात झाला. या दोन वाहनांत जोरदार धडक झाली.या अपघातात रिक्षाचालक जाधव गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पेण येथे नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघातग्रस्त रिक्षामधील प्रवाशांना कोलाड व माणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर कारमधील जखमी प्रवाशांनासुद्धा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, मात्र ते कोणत्या रुग्णालयात आहेत हे माहीत नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply