Breaking News

उरण येथे बुद्धपौर्णिमा साधेपणाने साजरी

उरण : वार्ताहर

उरण बौधवाडी येथील बौध्दजन पंचायत समिती शाखा नं 843  उरण व माता रमाई  महिला मंडळ उरण यांच्या वतीने बुध्द विहारमध्ये बुद्ध पोर्णिमा साधेपणाने साजरी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंग ठेऊन व शासकीय नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. बुद्धपाठ बौधाचार्य महेंद्र साळवी यांनी केला. या वेळी बौध्दजन पंचायत समिती शाखा नं 843 उरणचे अध्यक्ष प्रकाश कांबळे, सचिव विजय पवार, रोशन गाढे, खजिनदार सुरेश गायकवाड, बौधाचार्य प्रमोद कांबळे, तेजाब म्हसके, हरिश्चंद्र गायकवाड, मारूती तांबे, विनोद कांबळे, हर्षद कांबळे, प्रकाश जाधव, सुनिल गायकवाड,  संजय पवार, माता रमाई  महिला मंडळ उरण अध्यक्षा सुनिता सपकाळे, गिता कांबळे, सेक्रेटरी करुणा भिंगावडे, सुजाता साळवी, सविता साळवी व सर्व उपासक, उपासिका आदी उपस्थित होते.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त खांदा वसाहतीत गरजू रिक्षाचालकांना धान्याचे वितरण

पनवेल : वार्ताहर

खांदा वसाहतमधील सेक्टर 13 येथील मूलगंध कुटी बुद्ध विहार येथे तथागत गौतम बुद्धांची 2564 वी जयंती सोशल डिस्टन्सिंग ठेवून साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. रिक्षा चालकाचे व्यवसाय बंद पडले. यामुळे मूलगंध कुटी बुद्ध विहार तर्फे प्रत्येकी पाच किलो धान्य वाटप करण्यात आले. जगाला शांततेचा संदेश देणारे गौतम बुद्ध यांना पुष्प वाहून व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक एकनाथ गायकवाड़, सामजिक कार्यकर्ते सुरेश आयरे, बुद्ध विहार अध्यक्ष दिनेश जाधव, कार्यालयीन सचिव चंद्रसेन कांबळे उपस्थित होते. भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी तसेच डी. जे. जाधव विश्वास भालेराव, राहुल वाघमारे, प्रशांत जाधव उपस्थित होते.

शहराबाहेरून येणार्‍या कर्मचार्‍यांची व्यवस्था नवी मुंबईतच

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

वी मुंबई महापालिकेत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ व बदलापूर परिसरांतून कामासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांची नवी मुंबईतच राहण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नवी मुंबई शहरात राहणारे परंतु मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेसाठी जाणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे नवी मुंबईत करोनाबाधित रुग्ण वाढण्याचे प्रमाण हे मुंबई संपर्कातून असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री व मुंबईचे आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे हे स्थलांतर थांबविण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पालिकेने घेतली आहे. नवी मुंबई महापालिकेत स्थायी कर्मचारी 2 हजार 500 असून कंत्राटी पद्धतीवर मोठ्या प्रमाणात कर्मचारी आहेत. पालिका क्षेत्राबाहेरून नवी मुंबई शहरात येणार्‍यांची संख्या जवळजवळ 5 टक्के आहे. नवी मुंबई शहरात अत्यावश्यक सेवेत काम करणारे व शहराबाहेर राहणार्‍या कर्मचार्‍यांची माहिती काढण्याचे व कर्मचार्‍यांची राहण्याची सोय करण्याबाबतचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत, असे नवी मुंबई आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

Check Also

दिघाटीत आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रॅली

पनवेल : रामप्रहर वृत्त दिघाटी येथील महायुतीच्या प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. या वेळी …

Leave a Reply