कर्जत : प्रतिनिधी
रा. स्व. संघ जनकल्याण समितीच्या वतीने कर्जत नगर परिषदेच्या स्वच्छतादूतांचा भेटवस्तू आणि दिवाळी फराळ देऊन सन्मान करण्यात आला.भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह नितीन भावे यांनी प्रास्ताविकात समितीच्या जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. स्वच्छता अभियानामध्ये राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल तसेच अन्य पदाधिकारी आणि कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. जनकल्याण समितीचे कार्यवाह अविनाश धाट यांनी समितीच्या वतीने राज्यामध्ये चालणार्या उपक्रमांची माहिती दिली. नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, बांधकाम सभापती राहुल डाळिंबकर, आरोग्य अधिकारी सुदाम म्हसे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर उपस्थित स्वच्छता दूतांचा जनकल्याण समितीच्या वतीने भेटवस्तू व दिवाळी फराळ देऊन सन्मान केला. सूत्रसंचालन रवींद्र लाड यांनी केले. जनकल्याण समितीचे निधी प्रमुख संजीव दातार, विभाग कार्यवाह रविकिरण काळे, भाऊ पोंडेकर, संघाचे तालुका कार्यवाह संतोष देशमुख, विहिंपचे विशाल जोशी, साईनाथ श्रीखंडे, श्रीकांत ओक, भगवान भगत, वनवासी कल्याण आश्रमाचे योगेश चोळकर, महेश निघोजकर, मिलिंद खंडागळे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका आणि समितीचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.