Breaking News

पर्यटनासाठी समुद्रकिनारे होताहेत स्वच्छ

कर्जत : बातमीदार

पर्यटनाला चलन देण्यासाठी स्वच्छता हि बाब महत्वाची आहे.जगातील अनेक देश हे केवळ पर्यटनावर आपल्या देशाची आर्थिक सुबत्ता राखून आहेत. पर्यटनासाठी भारत हा जगात आघाडीवरील देश आहे. हे ओळखून पर्यटकांना आकर्षित करणारे समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यावरण आणि वन तसेच सामाजिक वनीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ निर्मल तट अभियानअंतर्गत उरण येथील समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. सुरुवातीला पथनाट्य सादर करीत विद्यार्थ्यांनी समुद्र किनारे स्वच्छ करण्याचे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न केला.

वन विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. दिनेश कुमार, सामाजिक वनीकरणच्या वन संरक्षक ज्योती बॅनर्जीं, जिल्हा वन संरक्षक मनीष कुमार, शास्त्रज्ञ रवींद्र फुलरीया, वन अधिकारी आप्पासाहेब निकम यांनी उपक्रमाची सुरुवात केली. त्यात 255 विद्यार्थ्यांनी तसेच समाजसेवी संघटना यांनी भाग घेतला.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply