नगरसेविका दर्शना भोईर यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील शासन मान्य दारू विक्रीची सर्व दुकाने पूर्णपणे बंद करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त व तहसिलदार यांना निवेदन सादर केले आहे. नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, कोरोना महामारीवर मात करण्याकरीता शासन पूरेपर कष्ट घेत आहे. सद्या पनवेलची परिस्थिती पाहता दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला आळा घालण्याकरीता पनवेल प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र सद्या काही ठिकाणांवर शासन मान्य दारु विक्रीची दुकाने उघडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मद्य पिण्याकरीता तासंतास उन्हात उभे असलेले नागरीकांचे प्रमाण वाढण्यात असल्याचे आढळून आले आहे व त्यामुळे शासनाने ठेवण्यात आलेल्या सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता अवैधरित्या व्यवहार चालू असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गर्दीचे प्रमाणात वाढ होऊन या वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता दाट शक्यता नाकारता येत नाही. तरी वरील विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन पनवेल महानगरपालिका हद्दीतील शासन मान्य दारु विक्रीची सर्व दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी जेणेकरुन त्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा बसण्यास प्रशासना सहकार्य होईल, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका दर्शना भोईर यांनी पनवेल महापालिका आयुक्त व तहसिलदार यांना निवेदन सादर केले आहे.