Breaking News

गारपोलीत वीज रोहित्र बॉक्स कोसळला; विजेचा धक्का लागण्याची शक्यता

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतमधील गारपोली गावाला वीज पुरवठा करणार्‍या वीज रोहित्र असलेली लोखंडी पेटी सडून खाली कोसळली आहे. त्यामुळे त्या भागातून जाणार्‍या जनावरे यांना विजेचा धक्का लागण्याची शक्यता असल्याने महावितरण विभागाने त्या वीज रोहित्र भागात नवीन पत्रे बसविण्यात यावेत अशी मागणी किशोर गायकवाड यांनी महावितरण कंपनीच्या नेरळ कार्यालयाला दिलेल्या पत्रात केली आहे. महावितरणच्या नेरळ येथील शाखा अभियंता यांच्या कार्यकक्षेत असलेल्या उमरोली ग्रा. पं. मधील गारपोली गावाला वीजपुरवठा करणारे वीज रोहित्र यांच्यावर असलेली लोखंडी पेटी कोसळून खाली पडली आहे. अनेक वर्षे ऊन पाऊस सहन करणारी या लोखंडी पेटीचे पत्रे सडून गेले असल्याने वीज रोहित्र सोडून ती पेटी कोसळली आहे. त्या भागातून स्थानिकांची गुरे ये-जा करीत असतात. गुरांना उघड्यावर असलेल्या वीज रोहित्राचा धक्का बसू शकतो. अपघात होण्याची भीती आहे.

Check Also

एकही झोपडपट्टीधारक बेघर होणार नाही; आम्ही तुमच्या ठामपणे पाठीशी!

आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठकीत ग्वाही पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल एसटी बसस्थानक ते रेल्वे स्टेशन …

Leave a Reply