Breaking News

बुद्ध पौर्णिमेनिमित्त सफाई कामगारांना नाश्ता

कुसुम पाटील व गणेश पाटील यांचा मदतीचा हात

कळंबोली :  प्रतिनिधी

विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या बुद्धपोर्णिमेनिमित्त देवी आंबा माता चॅरिटेबल ट्रस्ट खांदा कॉलनी तर्फे नगरसेविका कुसुम पाटील व माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांच्या हस्ते पनवेल महानगरपालिका सफाई कामगारांना चहा, पाणी, बिस्कीट, नाश्ता तसेच सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. गेली दोन महिने सफाई कामगार कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाच्या महामारीत पालिका हद्दीतील जनतेला कोणताही त्रास होऊ नये म्हणून आपली जबाबदारी पार पाडताना खूप मेहनत घेत आहेत. या कामगारांना माणुसकीच्या भावनेतून भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी वेळोवेळी मदतीचा हात दिला आहे.  बुध्द पौर्णिमा निमित्त त्यांनी सॅनिटाझरचे वाटप केले. तत्पूर्वी सकाळी जनसंपर्क कार्यालयात बुध्द वंदना घेण्यात आली. या वेळी नगरसेविका कुसुमताई पाटील या देखील उपस्थित होत्या. गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व शांतीचा संदेश देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाचे पालन करा! त्याचप्रमाणे कोरोनाच्या महामारीत  लॉकडाऊन काळात घरातच रहा सुरक्षित रहा,  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू या, असे आवाहन नगरसेविका कुसूम पाटील यांनी केले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply