मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 21 मे रोजी होणार्या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या चार उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. भाजपकडून प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते-पाटील अशा नव्या चेहर्यांना संधी दिली आहे.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या 21 मे रोजी निवडणूक होऊ घातली आहे. पक्षीय बलाबलानुसार नवव्या जागेसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात चुरस आहे. भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडीपेक्षा कमी मतांची गरज आहे. मतदान गुप्त असल्याने भाजप चौथी जागा लढविण्यावर ठाम असून, आम्हाला चार जागा सोडल्या गेल्या तर निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
Check Also
अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर
मुलीवर अत्याचार करणार्या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …