पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या उपायुक्त संध्या बावनकुळे यांची बदली झाली आहे. त्यांची बदली झाल्याने उपायुक्तपदाचा पद्भार सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. संध्या बावनकुळे जवळपास पनवेल महापालिकेच्या स्थापनेपासूनच महापालिका उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या. त्यांची आता झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालय, बांद्रा येथे बदली झाली आहे. प्रशासकीय कामकाजाचा भाग म्हणून ही बदली झाल्याचे सांगण्यात येत आहे. संध्या बावनकुळे यांची बदली झाल्याने उपायुक्त पदाचा पदभार सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपायुक्त जमीर लेंगरेकर व महापालिकेतील सर्व प्रभाग अधिकार्यांनी त्यांचे स्वागत केले.