पनवेल : कोरोनाचा कहर वाढतच असून, पनवेल तालुक्यात चार जणांचा या महामारीने मृत्यू झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचे कामोठ्यात दोन व खांदा कॉलनीत एक असे तीन बळी गेले असून, आठ नवीन रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीण भागात कोप्रोली येथील एका महिलेचा मृत्यू झाला असून, उसर्ली खुर्द, करंजाडे, उलवे नोड व कोप्रोली असे सात नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी (दि. 8) महापालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या 138 झाली आणि आजवरच्या मृतांचा आकडा पाच झाला. तालुक्यात कोरोनाचे 183 रुग्ण झाले आणि आतापर्यंत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याशिवाय उरण आणि अलिबागमध्ये प्रत्येकी एक नवीन रुग्ण आढळल्याने रायगड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 207 झाली, तर बळींचा आकडा आठवर पोहोचला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात कामोठ्यात कोरोनाचे चार रुग्ण आढळले असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. खांदा कॉलनीत आढळलेल्या रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. खारघरमध्ये तीन रुग्ण आढळले आहेत. कामोठे सेक्टर 34मधील मानसरोवर कॉम्प्लेक्समधील एकाच कुटुंबातील दोन महिलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 54 वर्षीय महिलेला ब्लड प्रेशर व लिव्हर इन्फेक्शनचा त्रास होता. तिचे निधन झाले. या महिलेची एका क्लिनिकमध्ये काम करीत असून, तिच्या पासून तिला संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कामोठे सेक्टर 11 येथील साई कृपा कॉम्प्लेक्समधील 70 वर्षीय व्यक्ती 5 मे रोजी गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाली होती. तिला डायबेटीसचा त्रास होता. खांदा कॉलनी सेक्टर 7 मधील श्रीगणेश बिल्डिंग येथील 52 वर्षीय व्यक्ती अदानी एनर्जी कंपनीत गोवंडीला कार्यरत होती. तिला 4 मे रोजी गंभीर अवस्थेत दाखल करण्यात आले होते त्यांचे निधन झाले आहे
खारघर सेक्टर 34 येथील मन्नत बिल्डिंगमधील 36 वर्षीय व्यक्ती मुंबईतील बीकेसी येथील सेबी भवनात कार्यरत होती. तिला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. सेक्टर 34 मधील सिमरन सफायर सोसायटीतील 34 वर्षीय व्यक्ती मुंबई एअर पोर्टवर सीआयएसएफ जवान आहे. सेक्टर 3 येथील मातोश्री बिल्डिंगमधील 35 वर्षीय व्यक्ती अपोलो हॉस्पिटलमध्ये कार्यरत होती. तिला त्या ठिकाणी संसर्ग झाला असावा. कामोठे सेक्टर 6 येथील शीतलधारा कॉम्प्लेक्समधील 23 वर्षीय व्यक्तीला तिच्या कुटुंबातील व्यक्तींपासून संसर्ग झाला आहे. आतापर्यंत पनवेल महापालिका हद्दीतील 1333 जणांची टेस्ट केली गेली आहे. त्यापैकी 36 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले नाहीत. कोरोना पॉझिटीव्हपैकी 92 जणांवर उपचार सुरू असून, 41 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे, तर पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये शुक्रवारी एका महिलेचा मृत्यू झाला असून, सात नवीन रुग्ण आढळले आहेत. कोप्रोली येथील महिलेचा रात्री मृत्यू झाला, तर उलवे नोड, उसर्ली खुर्द, करंजाडे व कोप्रोली येथे सात नव्या रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 45 रुग्णांपैकी सात जण बरे झाले आहेत.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …