Breaking News

दिवाळीत 112.3 डेसिबल ध्वनी प्रदूषणाची नोंद

हरित फटाके संकल्पनेला नागरिकांचा प्रतिसाद; 15 वर्षांतील सर्वात कमी प्रदूषण

अलिबाग : प्रतिनिधी

राज्यात दिवाळी उत्साहात साजरी झाली असली तरी यावर्षी कानठळ्या बनवणार्‍या फटाक्यांचा आवाज अत्यंत कमी प्रमाणात ऐकायला मिळाला. गेल्या 15 वर्षांतील सर्वात शांत दिवाळी यंदा सर्वत्र साजरी झाल्याचे निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून दिवाळीतील ध्वनी प्रदूषण विरोधात मुंबईत अधिक प्रमाणावर जागृती सुरू आहे. यंदा दिवाळीत ध्वनी प्रदूषणाची नोंद 112.3 डेसिबल इतकी झाली आहे. त्याच बरोबर रात्री 10 वाजेपर्यंतच फटाके वाजवण्याची परवानगी होती, ती नागरिकांनी स्वेच्छेने पाळल्याचे सर्वत्र दिसून आले. सन 2017च्या दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता 117.8 डेसिबल इतकी होती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने फटाक्यांच्या वापराबाबत गेल्या दोन महिन्यांपासून विविध स्तरावर जनजागृती मोहिमांचे आयोजन केले होते. त्यातील शाळांमधील जनजागृती मोहिमांचा परिणाम मोठ्या प्रमाणात सकारात्मक झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी सांगीतले. दरम्यान, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि निरी यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा प्रथमच बेरियममुक्त ग्रीन फटाके प्रथमच बाजारात आणले होते, त्याचा स्वीकार नागरिकांनी मोठ्या प्रमाणात केल्याने वायू आणि ध्वनी प्रदूषणात राज्यात सर्वत्रच मोठी घट झाल्याचे निष्कर्ष प्राप्त होत असल्याचे भुस्कुटे यांनी सांगितले. फटाक्यात बेरियम हे अत्यंत घातक रसायन वापरले जाते. त्यास आळा घालण्याकरिता बेरियनमुक्त ग्रीन फटाके ही संकल्पना यंदा प्रथमच अंमलात आणली गेली. आगामी वर्ष हे ग्रीन फटके सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, असेही भुस्कुटे यांनी सांगितले. नागरिकांनीदेखील प्रदूषणमुक्त दिवाळीला प्रतिसाद दिल्यानेच हे परिणाम साध्य होऊ शकले असल्याचे भुस्कुटे यांनी सांगितले. फटाक्यात बेरियम हे अत्यंत घातक सरायन वापरले जाते. त्यास आळा घालण्याकरिता बेरियनमुक्त ग्रीन फटाके ही संकल्पना यंदा प्रथमच अंमलात आणली गेली. आगामी वर्षात हे ग्रीन फटके सर्वत्र मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील, असेही संजय भुस्कुटे यांनी सांगितले.

राज्यात प्रदूषण मात्रा मोजणीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मीटर्सवरील नोंदी प्राप्त झाल्यानंतर व त्यांचा तुलनात्मक अभ्यास पूर्ण झाल्यावर प्रदूषण नेमके किती कमी झाले याचे निष्कर्ष काढता येतील. परंतु गेल्या 10 वर्षांतील सर्वात कमी प्रदूषण यंदाच्या दिवाळीत अनुभवास आले आहे.

-संजय भुस्कुटे, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply