कडाव : प्रतिनिधी
शासनाने केल्यानंतर आवाहनाला प्रतिसाद देत काही ग्रामपंचायतींनी या देशकार्यात सहभागी होऊन रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेतला आहे. याच उद्देशाने मांडवणे ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दोन महिला व 24 पुरुषांनी रक्तदान करुन देश कार्यात सक्रिय सहभाग घेतला आहे. रविवारी (दि. 10) मांडावणे ग्रामपंचायत हद्दीतील हरेहरेश्वर मंदिराच्या भव्य सभागृहात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत मांडावणे ग्रामपंचायत व डॉ. डि. वाय. पाटील हॉस्पिटलमधील वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून रक्तदान शिबिर झाले. कोरोनासारख्या महामारीचे भीषण संकट देशासमोर उभे आहे. त्यामुळे विविध राज्यासह महाराष्ट्रातही आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, आज कोरोना रुग्णांना उपचारादरम्यान रक्त पुरवठा कमी पडू नये, यासाठी अशी रक्तदान शिबिर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून आयोजित होणे गरजेचे आहे, असे मांडावणे ग्रामपंचायत सरपंच पुष्पा पंढरीनाथ आगज यांनी सांगितले.