Breaking News

पनवेल मनपाची इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत येणार

पनवेल : प्रतिनिधी
महापालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. खाजगी इंग्रजी माध्यामांच्या शाळांची फी भरणे गरीब पालकांना शक्य नसते. ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन इंग्रजी माध्यामाची शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्यात येणार आहे.
सद्यपरिस्थितीत बहुतांश पालकांचा ओढा हा इंग्रजी माध्यमाकडे असल्याने पनवेल महापालिकेने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापौर डॉ. कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्रस्ताव तयार केला असून तो येत्या महासभेत सादर केला जाणार आहे.
सध्या पनवेल महापालिकेमार्फत 11 शाळा चालविण्यात येत आहेत. या शाळांपैकी आठ मराठी माध्यम, दोन ऊर्दु आणि एक गुजराती शाळा आहे, मात्र अद्यापपर्यंत महापालिकेची एकही इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली नव्हती. खाजगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांची फी भरणे गरीब पालकांना शक्य नसते. या पार्श्वभूमीवर महापालिका क्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण नि:शुल्क मिळावे या हेतूने पालिकेने इंग्रजी माध्यामाची शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
नव्याने प्रस्तावित या शाळेचा सर्व खर्च महापालिकेला स्वत:च्या निधीतून करावा लागणार आहे. सुरुवातीच्या पूर्व प्राथमिक शाळा तसेच इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू करण्यापूर्वी शासनाची परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. त्या दृष्टीने शिक्षण विभागाने हा प्रस्ताव तयार केला असून  तो येत्या महासभेत महापालिका सदस्यांसमोर मांडण्यात येणार आहे.
असे आहे नियोजन
इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधी व सर्वसामान्य जनतेतून वारंवार मागणी होत असल्याने महापालिकेने पूर्व प्राथमिक ते इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. इंग्रजी माध्यमाची ही शाळा या वर्षापासूनच सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये पूर्व प्राथमिकच्या ज्युनिअर केजीच्या वर्गापासून सुरुवात करून दरवर्षी पुढील इयत्तांचे एक-एक वर्ग वाढविण्यात येणार आहेत.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply