
उलवे (ता. पनवेल) : समाजसेवक किरण मढवी व त्यांच्या पत्नी हेमल मढवी यांनी जागतिक पर्यावरण दिन व वटपौर्णिमेचे औचित्य साधून परिसरात वटवृक्षांचे रोपण केलेे. बर्याच ठिकाणी वडाच्या फांद्या तोडून वटपौर्णिमा साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय प्रतिक असलेला वटवृक्ष संवर्धनाची काळाची गरज ओळखून मढवी दाम्पत्याने वटवृक्षाची लागवड करून वटपौर्णिमा साजरी केली.