Breaking News

माऊलींच्या वारी प्रस्थानानिमित्त ‘अभंग सुमनांजली’चे थेट प्रक्षेपण

पनवेल ः प्रतिनिधी
माऊलींच्या वारी प्रस्थान सोहळ्यानिमित्त शनिवारी (दि. 13) महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर गायनाच्या अभंग सुमनांजली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मल्हार टिव्हीवर होणार आहे. या कार्यक्रमासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. कार्यक्रमाचा भक्तमंडळींनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 आज संपूर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर आषाढी पायी दिंडी सोहळा शासनाने रद्द केला आहे. माऊलींच्या पालखीचे प्रस्थान ते आषाढी एकादशी अर्थात 13 जून ते 1 जुलै असे 19 दिवस महाराष्ट्रातील तमाम वारकरी, भक्त, वैष्णवांसाठी दीपावली उत्सवच असतो. त्या अनुषंगाने मल्हार टिव्हीने माऊली वारीच्या प्रस्थान सोहळ्याची सर्व भक्तांना हरिभजनाची अनुभूती घरबसल्या घेता यावी या हेतूने महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक पंडित उमेश चौधरी यांच्या सुमधूर अभंग गायनाचे थेट प्रक्षेपण शनिवारी सायंकाळी 6 वाजता प्रसारित करण्याचे आयोजिले आहे. त्याचबरोबर सद्गुरू माऊली या फेसबुक पेजवर तसेच गाव माझा या चॅनेलवरही त्याचवेळी कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे.
 रायगड जिल्ह्यास सांस्कृतिक वरदान लाभले आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रांत येथील प्रज्ञावंतांनी कर्तृत्वाची उत्तुंग शिखरे गाठली आहेत. रायगडला जशी अफाट सौंदर्याने भरलेली वनश्री लाभली तशीच गंधर्वांच्या गोड गळ्यातील स्वरश्रीदेखील येथील गायक कलावंतांना लाभली आहे. त्यातून वारकरी सांप्रदायाची पताका, शास्त्रीय संगीताचा वारसा जपण्याचे कार्य करणारे संगीत सुरमयी व्यक्तिमत्त्व पंडित उमेश चौधरी यांच्या अभंग सुमनांजली कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमधूर वाणीचे श्रवणसुख घेता येणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply