Breaking News

राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत गव्हाण विद्यालयाचे यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेच्या गव्हाण येथील श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थीनी सानिका तानाजी चव्हाण व प्रचिता रवींद्र भोईर या दहावीमध्ये शिकणार्‍या विद्यार्थीनींनी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा अर्थात एनटीएस या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन गत वर्षीची परंपरा कायम राखीत विद्यालयाच्या यशाच्या शिखरामध्ये मानाचा तुरा रोवला आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी तसेच  विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होऊन त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची चाचपणी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ही परीक्षा घेण्यात येते. या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाच्या स्थानिक शाळा समितीचे चेअरमन अरुणशेठ भगत, स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, रयत शिक्षण संस्थेचे लाइफ मेंबर प्रमोद कोळी लाइफ वर्कर रवींद्र भोईर, विद्यालयाच्या प्राचार्या साधना डोईफोडे, उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दिपक भर्णुके आदींनी हार्दिक अभिनंदन केले. स्थानिक शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य अनंताशेठ ठाकूर यांनी विद्यालयाच्या प्रांगणात या दोन्ही विद्यार्थीनी व त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणारे सर्व अध्यापक, परीक्षा प्रमुख वाय. एस. पाटील, वर्गशिक्षक सागर रंधवे यांचेही अभिनंदन होत आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply