Breaking News

रक्तदान शिबिरास प्रतिसाद

खोपोली ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटकाळात खोपोली मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टकडून विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोहना समाज व सर्वोदय ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रविवारी (दि. 28) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत येथील मुस्लिम समाज सभागृहात रक्तदान शिबिर संपन्न झाले. या वेळी मोठ्या संख्येने सर्वधर्मीय तरुणांनी रक्तदान केले. रक्तदान करणारे तरुण तसेच शिबिराचे आयोजन करणार्‍या मुस्लिम वेल्फेअर ट्रस्टच्या सदस्यांचा उत्साह वाढविण्यासाठी मान्यवर तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Check Also

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा उभारणी व सुशोभीकरण समितीची बैठक

शिवसृष्टीच्या उभारणी कामाला लवकरच होणार सुरुवात पनवेल ः रामप्रहर वृत्तमुंबईतील शिवाजी पार्कच्या धर्तीवर उलवे नोडमध्ये …

Leave a Reply