Breaking News

‘कोरोना’च्या अफवांना ऊत

नागरिकांमधून कारवाईची मागणी

उरण : रामप्रहर वृत्त

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असताना आपल्या देशातही या व्हायरसचे रुग्ण आढळल्याचे समजते याला आद्यपपर्यंत कोणताही दुजोरा मिळत नाही. मात्र उरण तालुक्यातील आवरे गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याची पोस्ट व्हॉट्सअ‍ॅपला व्हायरल झाली आहे. परंतु अशा प्रकारचा कोणताही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे. तरी अशाप्रकारे पोस्ट व्हायरल करणार्‍याचा पोलीस यंत्रणेनी शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कोरोनाच्या आजाराची दहशत जगाला बसली आहे. त्यामुळे आपल्या देशातही भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात काही समाजकंटक याचा फायदा उठवत अफवा पसरविण्याचे काम करीत आहेत. अशाच प्रकारची उरण तालुक्यातील आवरे गावात कोरोनाचे रुग्ण सापडल्याचे एका टीव्ही न्यूज चॅनेलवर फोटो एडिट करून अफवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरविण्यात आली. मात्र याची खातरजमा केली असता ती अफवा असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगत अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जनतेला केले आहे. यामुळे कोरोनाचा रुग्ण सापडलेल्याच्या अफवेमुळे उरणमध्ये झालेले भीतीचे वातावरण दूर झाले आहे. परंतु अशा अफवा पसरविणार्‍यांवर कडक कारवाई उरण पोलिसांनी करावी अशी मागणी उरणच्या जनतेतून होत आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply