पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, बुधवारी (दि. 21) नव्या 184 रुग्णांची आणि 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 244 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 117 व ग्रामीण 28) तालुक्यातील 145, अलिबाग 12, खालापूर, कर्जत व रोहा प्रत्येकी पाच, पेण व माणगाव प्रत्येकी चार, उरण दोन आणि मुरूड व तळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण पनवेल तालुक्यात सहा, उरण तीन, माणगाव दोन आणि पेण व श्रीवर्धन तालुक्यात प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 52,555 आणि मृतांची संख्या 1501 झाली आहे. जिल्ह्यात 49,113 जण कोरोनामुक्त झाल्याने 1941 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper