Breaking News

उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर पडतच नाहीत : चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी
राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दररोज राज्याच्या वेगवेगळ्या भागांचे दौरे करीत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र मातोश्रीवरून बाहेर पडायला तयार नाहीत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. ते मंगळवारी (दि. 7) पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवले. पाटील यांनी म्हटले की, फडणवीस रोज कुठे ना कुठे फिरताहेत. त्यांना काय कोरोनाची भीती नाही का? मुख्यमंत्री मात्र घराबाहेर पडतच नाहीत.
आतापर्यंत केवळ दोन वेळा मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीवरून बाहेर पडले. कोणी मातोश्रीवर गेले तरी त्यांना मुख्यमंत्री त्यांना भेटायला तयार होत नाहीत. यापूर्वी 2004 साली शरद पवार मातोश्रीवर गेले होते, परंतु गेल्या सहा महिन्यांत पवारांनी मातोश्रीवर तीन-चार फेर्‍या मारल्या आहेत. त्यांना इतक्या वेळा तिकडे जायला लागू नये, असे पाटील म्हणाले.
दरम्यान, या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील हातावर पोट असलेल्या लोकांना एका महिन्यासाठी नोकरी देणार असल्याचे जाहीर केले तसेच यापुढील काळात लॉकडाऊन झेपणार नाही, असे मतही व्यक्त केले.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply