Breaking News

खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रोच्या रस्त्यावर पथदिवे उभारा

सिडकोकडे नागरिकांची मागणी

खारघर : प्रतिनिधी

सिडकोच्या विद्युत विभागाने खारघरमधील सेक्टर 34कडून सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावर पथदिवे उभारले नसल्यामुळे रस्त्यावर अंधार पसरला आहे. अंधाराचा फायदा घेत काही चोरट्यांकडून लूटमार होण्याची शक्यता आहे. सिडकोच्या विद्युत विभागाने या रस्त्यावर पथदिवे उभारावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. 

सिडकोने खारघर शहर विकसित करताना सेक्टरनिहाय, उद्यान, मैदान आणि रस्त्यावर पथदिवे उभारले आहेत, मात्र सेंट्रल पार्क मेट्रो स्थानकापासून सेक्टर 34कडे जाणार्‍या मेट्रो मार्गाखालील रस्त्यावर  पथदिवे उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे जवळपास एक किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर अंधार  पसरला आहे. सिडकोच्या मार्गावरील पेठ पाडा मेट्रो स्थानक आहे. या स्थानकाला लागून 10 फुटाच्या अंतरावर एनएमआयएमएस आणि रामशेठ ठाकूर महाविद्यालय आहे. या दोन्ही महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येत्या काही दिवसांत महाविद्यालय सुरू होईल. त्यामुळे सिडकोने महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी रस्त्यावरील दिवे सुरू करावे, अशी मागणी महाविद्यालयाच्या कर्मचारी वर्गाने केली आहे. सिडकोच्या जनसंपर्क विभागात विचारणा केली असता, या रस्त्यावर नव्याने पथदिवे उभारण्यात यावे याविषयी विद्युत विभागाला माहिती दिली जाईल, असे सांगण्यात आले.

अंधारात अनुचित प्रकार घडण्याची शक्यता

या रस्त्याच्या कडेला ओवेपेठ गाव आहे. रात्री महिला लहान मुले ये-जा करतात. तर चालण्यासाठी नागरिक येत असतात. सिडकोकडून या रस्त्याच्या बाजूला फुलबॉल स्टेडियम उभारणीचे काम सुरू आहे, मात्र दहा मीटर अंतरावरील रस्त्यावर अंधार पसरला आहे. अंधारात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास कोण जबाबदार असा प्रश्न नागिरकांकडून विचारला जात आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply