म्हसळा ः प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाने लॉकडाऊन जारी केले असतानाही म्हसळा तालुक्यातील चिखलप आदिवासीवाडी येथे हातभट्टी रसायन तयार करणे आणि दारूविक्री करण्याबाबत दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
गु. र. नं. 13 व 14मध्ये फिर्यादी गणेश महादेव मुंडे 426 पो. कॉ. यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949चे कलम 65(फ)(ई) भा. दं. वि. कलम 269, 270, 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51 (ब)प्रमाणे व शासनाने लॉकडाऊन जारी केले असताना तसेच या कालावधीत रायगड जिल्ह्यात जिल्हाधिकार्यांनी बार, परमिट रूम, दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देऊनही आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे सदर गुन्ह्याची नोंद करून बाळाराम पवार आणि रमेश पवार यांना म्हसळा पोलिसांनी अटक केली आहे. एपीआय धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शामराव कराडे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.