चिरनेर : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेर येथील 1884मध्ये स्थापन झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा नववा स्नेहमेळावा रविवारी (दि. 17) रा.जि.प. केंद्रीय शाळेत होणार आहे. उरण पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर मोकल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या या मेळाव्याचे उद्घाटक सरपंच चिर्लेकर यांच्या हस्ते संस्थापक वसंत भाऊ पाटील, अध्यक्ष दामोदर केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य गणेश ठाकूर, निवृत्त न्यायाधीश चंद्रहास म्हात्रे, उद्योगपती पी. पी. खारपाटील, एकनाथ पाटील, उद्योगपती राजेंद्रशेठ खारपाटील, जि. प. सदस्य बाजीराव परदेशी, माजी सदस्य संतोष ठाकूर, पं. स. सदस्या शुभांगी पाटील, निवृत्त अधिकारी, के. एम. पाटील, मधुकर केणी, बळीराम म्हात्रे, नंदकुमार पाटील, सुरेश पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, साहित्यिक ए. डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.