Sunday , October 1 2023
Breaking News

संघर्ष प्रतिष्ठानकडून शिवजयंती सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

सामाजिक उपक्रमांत अग्रेसर असणार्‍या संघर्ष प्रतिष्ठानकडून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. 19) खांदा कॉलनी सेक्टर 13 येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या वेळी प्रतिष्ठानकडून लोकोपयोगी कार्यक्रम, तसेच लहान मुलांसाठी क्रीडा स्पर्धा होणार असल्याची माहिती निमंत्रक आणि प्रमुख सल्लागार डॉ. एस. एस. सपकाळ यांनी दिली.

लहान मुलांसाठी चित्रकला आणि मैदानी खेळांच्या स्पर्धा सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भरविण्यात येणार आहेत. मंगळवारी मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी 8 वा. शिवरायांची मूर्तिस्थापना, ढोल पथक मानवंदना आदी कार्यक्रम होणार आहेत. 9.30 ते 2 या वेळेत शिवनेर हेल्थ केअर आणि आय केअर सेंटर यांच्या वतीने मोफ त आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. सायंकाळी 4 ते 5 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, तसेच विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण आणि 5 वाजता शिवरायांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply