Sunday , October 1 2023
Breaking News

संतोष आंबवणे यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार

पनवेल : बातमीदार

पनवेल महापालिका निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2019 राबविण्यात आला. यानिमित्त व्यापारी आणि उद्योगपती यांचे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले होते. स्वकर्तृत्वावर विविध क्षेत्रांत नाव कमवत असलेल्या यशस्वी उद्योजकांचा या वेळी पुरस्कार देऊन सन्मान

करण्यात आला. यात संतोष आंबवणे यांना यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमास पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, तसेच नगरसेवक, नगरसेविका, उद्योजक व विविध क्षेत्रांतील नागरिक उपस्थित होते.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply