मुरूड ः प्रतिनिधी
चीन हा बाजारपेठा काबीज करण्यासाठी इतर देशांवर लष्करी दबाव आणून काही भाग आपल्या ताब्यात घेण्याचे षड्यंत्र रचत आहे. त्यामुळे भारतीयांनी चीनमध्ये उत्पादित वस्तू खरेदी करू नये, त्याचप्रमाणे स्वदेशी वस्तूंचा वापर करावा यासाठी युथ फॉर्च्युन स्वयंसेवी संघटनेकडून तहसीलदार गमन गावित यांना निवेदन सादर करण्यात आले. या वेळी संघटनेचे सचिव मनोज रोटकर, खजिनदार प्रथमेश सुर्वे, संस्थापक अध्यक्ष अॅड. सविता पिंगळे, संग्राम पिंगळे, रूपेश पाटील, जयेड खानजादा, अॅड. कुणाल जैन, विशाल घरत, राहुल रामावत, निखिल भगत आदी उपस्थित होते. चीनमध्ये तयार झालेल्या राख्या त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक सामानाची लोकांनी खरेदी करू नये. भारतीय बनावटीच्या वस्तूंचा वापर करावा. चीन हा भारताचा शत्रू असून त्या देशातील वस्तू खरेदी करून त्यांची अर्थव्यवस्था बळकट करू नये यासाठी युथ फॉर्च्युन स्वयंसेवी संघटनेकडून जनजागृती अभियान राबवण्यात येत असून ठिकठिकाणी भिंतीपत्रके, बॅनर, होर्डिंग्ज लावून प्रचार करण्यात येत आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष, व्यापारी असोसिएशन मुख्याधिकारी यांना देण्यात आले.