पुणे : जगभरात कोरोना विषाणू आजाराने थैमान घातले असून, या आजारावरील लस पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडूनही तयार करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (दि. 28) दुपारी 1 ते 2 या वेळेत येथे भेट देऊन माहिती घेणार आहेत. या वेळी ‘सिरम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांच्यासह शास्त्रज्ञ आणि संशोधकांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. दरम्यान, 4 डिसेंबर रोजी 100 देशांचे राजदूतदेखील या ठिकाणी येऊन कोविड लशीबाबत सद्य परिस्थितीचा आढावा घेणार होते. त्यानुसार सर्व तयारी करण्यात आली होती, मात्र हा नियोजित दौरा काही कारणास्तव रद्द झाला असल्याची माहिती राजशिष्टाचार अधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.
Check Also
सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …