उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप यांच्या अध्यक्षतेखाली माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची उरण तालुकास्तरीय सभा सुरक्षित अंतर पाळून संत निरंकारी भवन हनुमान कोळीवाडा उरण येथे घेण्यात आली.
या वेळी सभेचे उद्देश व चर्चा, सामाजिक व शासकीय कामकाज, माहिती अधिकार कायदा, भ्रष्टाचार निर्मूलन, कायद्याचे उद्देश, महत्वपूर्ण बाबी, माहिती या शब्दाचा अर्थ, अर्ज पध्दत, अपिल, माहिती आयोगाचे पत्ते, संघटनेचे लेटर हेड बनविणे व वापरणे याविषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात सभासदांना व कार्यकर्त्याला माहिती अधिकार पुस्तके व नमुना अर्ज वाटप, संघटनेचे लेटर हेड बनविणे व वापरणे याबाबत सांगण्यात आले. त्याचप्रमाणे सर्वसाधारण सभा अधिकार कार्य, पदाधिकार्यांची रचना व कार्य, सभासदांना कायद्याची माहिती देणे आदी माहिती देण्यात आली. या सभेस उरण तालुका संपर्क प्रमुख शर्मिला कोळी, उरण तालुका मुख्य संघटक सदानंद कोळी, प्रदीप पाटील, नरेश कोळी, दिप्ती पाटील, शिवाजी ठाकूर, अजय कोळी, उरण तालुका निरीक्षक निखील गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी विचारविनिमय झाला.