पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजप, रिपाइं युतीच्या रूचिता लोंढे यांनी जोरदार आघाडी घेतली असून, युतीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 3) त्यांचा दणकेबाज प्रचार केला. या वेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
नगरसेविका मुग्धा लोंढे यांच्या अपघाती निधनाने रिक्त झालेल्या पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 19‘ब’ च्या जागेसाठी त्यांची कन्या रूचिता लोंढे यांना भाजप युतीच्या वतीने पोटनिवडणुकीची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ युतीचे कार्यकर्ते जोमाने झटत असून, पनवेल शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार प्रचार करण्यात आला.
या प्रचारात आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक संतोष शेट्टी, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, जिल्हा सरचिटणीस अविनाश कोळी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, वर्षा ठाकूर, संजय जैन, भरत जाधव, स्वाती कोळी, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, प्रशांत झुंजारराव, अमित ओझे, प्रभाग क्रमांक 19चे अध्यक्ष पवन सोनी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी रूचिता लोंढे यांनी मतदारांचे आशीर्वाद घेतले.
Check Also
पनवेल-उरणच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार बैठक
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा पाठपुरावा मुंबई : रामप्रहर वृत्तसिडकोमार्फत पनवेल व …
RamPrahar – The Panvel Daily Paper