Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर भाजपकडून फळवाटप

खारघर : रामप्रहर वृत्त – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या जन्मदिवसानिमित्त (सेवासप्ताह) खारघरमधील गरीब वस्त्यांमध्ये व रुग्णांना सोमवारी (दि. 14) भाजप खारघर तळोजा मंडल उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या नेतृत्वाखाली खालील आठ ठिकाणी फळे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यामध्ये गिरीजा वृद्ध आश्रम. सेक्टर 12 एफ लाईन, गिरीजा आश्रम सेक्टर12 जी लाईन, आशा लय अनाथ आश्रम. सेक्टर 12 ए लाईन, हैदर वाडी, फणस वाडी,  चाफेवाडी, खारघर झोपडपट्टी सेक्टर 15, खान दवाखाना सेक्टर 13 याठिकाणी फळांचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमात आदेश भोईर, विनोद दाभोळकर, आनंद कांबळे, शिवाजी कचरे,  बंडूशेट झिंगरूट, सचिन केदार, बबलू मेहेरोवालीया, कमलेश मिश्रा, विघ्नेश खडकर, पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply