Breaking News

पनवेल तालुक्यात 284 नवीन रुग्ण

तिघांचा मृत्यू; 229 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात सोमवारी (दि. 14) कोरोनाचे 284 नवीन रुग्ण आढळले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 229 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 209 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर 169 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 75 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 60 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल तहसील कार्यालया जवळ कनक सरोवर, खारघरमध्ये अंचित हितरण सोसायटी आणि सेक्टर 20 विशाल जुन्नर सोसायटी येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सोमवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 20 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2523 झाली आहे. कामोठेमध्ये 68 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3310 झाली आहे. खारघरमध्ये 40 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3081 झाली आहे. नवीन पनवेलमध्ये 25 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 2818 झाली आहे. पनवेलमध्ये 52 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 2699 झाली आहे. तळोजामध्ये चार नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 689 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 15120 रुग्ण झाले असून 12680 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.86 टक्के आहे. 2093 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 347 जणांचा

मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये त्यामध्ये उलवे 16, करंजाडेक आठ, आडई पाच, सुकापूर पाच, भोकरपाडा, दापोली, देवळोली, कोळवाडी प्रत्येकी तीन, कानपोली, तुराडे, पोयंजे, तुरमाळे, उसर्ली, आकूर्ली, कोळखे प्रत्येकी दोन, टेमघर, शिवकर, कुडावे, खेरणे, कराडे खुर्द, हरिग्राम, गुळसुंदे, डेरवली, बारापाडा, आकुळवाडी, विचुंबे, पाले बुद्रुक, पळस्पे, न्हावा, नेरे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पनवेल ग्रामीणमध्ये आतापर्यंत  कोरोना पोझिटिव्हची संख्या 4824 झाली असून 3854 जणांनी कोरोनावर मात केली असून 86 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात सहा बाधित

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात सोमवारी कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले असून दिवसभरात 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.आढळलेल्या रुग्णांमध्ये द्रोणागिरी नोड, सोनारी, केगाव-दांडा, बालई, देऊळवाडी, एमएसईबी कॉलोनी बोकडवीरा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये, जेएनपीटी, नवघर, चिरनेर प्रत्येकी दोन व हनुमान कोळीवाडा, म्हातवली, जेएनपीटी टाउनशिप, कोटनाका, बोरी, चिरनेर, कुंभारवाडा, मुळेखंड येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. उरण तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1652 झाली आहे. त्यातील 1334 बरे झालेले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. फक्त 239 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत व आतापर्यंत 79 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत 342 जणांना संसर्ग

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत 342 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नवी मुंबईने बधितांची संख्या 31 हजार 005 झाली आहे, तर 292 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याने बरे झालेल्यांची 26 हजार 777 झाली आहे. दिवसभरात चार जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 665 झाली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 49, नेरूळ 57, वाशी 77, तुर्भे 53, कोपरखैरणे 33, घणसोली 33, ऐरोली 36, दिघा चार, अशी आहे. सद्य स्थितीत नवी मुंबईत तीन हजार 563 रुग्ण उपचार घेत आहेत.

कर्जतमध्ये 27 पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात सोमवारी 27 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आले असून आजपर्यंत 1266 रुग्ण आढळले असून 979 रुग्ण बरे झाले आहेत. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 56 वर गेली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये बोपेले पाच, मुद्रे बुद्रुक दोन,  दहिवली दोन, माथेरान दोन, बीड बुद्रुक दोन, विठ्ठल नगर, स्वप्न नगरी, मुद्रे खुर्द, कर्जत शहर, हालीवली, किरवली, तिघर, कशेळे, गौरकामत, मोठे वेणगाव, पोशिर, वैजनाथ, बांधिवली, आसल येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

महाडमध्ये 18 जणांना लागण

महाड : प्रतिनिधी – महाडमध्ये सोमवारी कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळून आले असुन, 19 जणांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये मातृदया नवीपेठ तीन, तांबडभुवन, सरेकरआळी, वरंध, काकरतळे, नवीपेठ, भावे, भगवानदास बेकरी, नांगलवाडी, रोहीदास नगर, काकरतळे, कुसगाव, हायस्कुल चांढवे, पोलीस लाईन तांबडभुवन, नातेखिंड, नांगलवाडी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. महाडमध्ये कोरोनाचे 223 रुग्ण उपचार घेत असून, अजुन पर्यंत 1096 रुग्ण बरे झाले आहेत तर 1370 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply