Friday , September 29 2023
Breaking News

जम्मू बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला; 1 ठार, 30 जखमी

जम्मू : वृत्तसंस्था

जम्मूमधील बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. बसस्थानकावरील तिकीट खिडकीच्या दिशेने ग्रेनेड टाकण्यात आला होता, यानंतर मोठा स्फोट झाला. गुरुवारी (दि. 7) सकाळी 12 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात 30 जण जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ग्रेनेड टाकण्यात आला तेव्हा सुदैवाने बसस्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित नव्हते अन्यथा आकडा जास्त असण्याची भीती होती. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्याचं नेमकं कारण, तसेच कोणाला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता याचा शोध घेतला जात आहे. जम्मूचे आयजीपी एम. के. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ला होईल, अशी शक्यता होती आणि पोलीस त्यादृष्टीने सर्व उपाययोजना करत होते, मात्र कोणतीही ठराविक माहिती देण्यात आलेली नव्हती. याआधीही दहशतवाद्यांनी बसस्थानकावर ग्रेनेड हल्ला करत टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे. जम्मू बसस्थानकावर नेहमीच प्रवाशांची मोठ्या संख्येने गर्दी असते. याशिवाय इतर राज्यांसाठीही येथून बस सोडल्या जातात, मात्र हल्ला झाला तेव्हा सुदैवाने प्रवाशांची गर्दी नव्हती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर झालेला हा पहिला दहशतवादी हल्ला असून यामध्ये अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसर सील केला. गुरुवारी जो ग्रेनेड हल्ला करण्यात आला तो हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने घडवला असल्याची माहिती पोलीस महासंचालक मनीष सिन्हा यांनी दिली आहे.

Check Also

पनवेलमधील रोजगार मेळाव्यात उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान

केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये …

Leave a Reply