![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2020/09/maratha-samaj-1024x684.jpg)
नवी मुंबई : बातमीदार
राज्यामध्ये मराठा समाजासाठी लागू असलेल्या आरक्षणाला सर्वोच न्यायालयाने स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे मराठा समाजात नाराजी पसरलेली असून नवी मुंबई वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करत राज्य सरकार विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त करण्यात आला. या वेळी माथाडी नेते नरेंद्र पाटील, माजी नगरसेविका भारती पाटील, दत्ता घंगाळे, विनोद पार्टे, अंकुश कदम यांसह अनेक मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.